जागरूक लोकमत समाचार
पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२५-२०३० कार्यकाळासाठी संचालक मंडळाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मा. आमदार संजय चंदुकाका जगताप यांच्या आई आनंदीकाकी चंदुकाका जगताप अध्यक्षपदी तर कृष्णा शेट्टी उपाध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले.

निवड प्रक्रियेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सरव्यवस्थापक संजय शितोळे, जिल्हा विशेष लेखा परीक्षक संजय पाटील, कार्यालयीन अधीक्षक संजय ससाणे, सहकारी अधिकारी सोनाली देसाई तसेच सिद्धार्थ झांजे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अंकुशराव जगताप, आनंदराव घोरपडे, डॉ. विनायक खाडे, राजेश इंदलकर, गुरुनाथ कोथेर, अनिल कामटे, चंद्रकांत बोरकर, बाबासो चौंडकर, परशुराम तांबे, अमोल सातभाई, सूर्यकांत कांबळे, अनिल उरवणे, सतीश शिंदे आणि हरीभाऊ शिंदे यांचीही उपस्थिती नोंदवली गेली.
नवनिर्वाचित अध्यक्ष आनंदीकाकी जगताप आणि उपाध्यक्ष कृष्णा शेट्टी यांना मा. आमदार संजय चंदुकाका जगताप यांनी शुभेच्छा देत आगामी कार्यकाळ सहकार क्षेत्र अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.
संचालक मंडळाने संस्थेच्या सदस्य-केंद्रित कामकाजाला प्राधान्य देण्याचे तसेच पारदर्शकतेवर भर देण्याचे आश्वासन दिले. नव्या नेतृत्वाकडून संस्था अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.